उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात नियम मोडला; कारण जाणून बसेल धक्का…!

बीड दि.8 एप्रिल – राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार यांची ओळख कठोर आणि नियमांचे पालन करणारे अशीच आहे. गेल्या दोन वर्षात अजित पवार यांनी पहिल्यांदाच नियम मोडल्याची कबुली आज बीड जिल्ह्यात दिली. मास्क वापरण्यात कसलीही आडकाठी न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अखेर मास्क काढल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणुच्या (Corona Virus) पहिल्या लाटेपासूनच अजित पवार यांनी कोरोना नियमांचं पालन करण्याची सक्त ताकीद सर्वांना दिलेली होती. राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आली त्यावेळी अजित पवार देखील कोरोना बाधित (Corona Positive) झाले होते. तेव्हापासूनच अजित पवार मास्क (Mask) वापरण्याची शिस्त पाळत होते आणि इतरांनाही पाळायला सांगत होते.
आज अजित पवार यांनी स्वतः लोकांसमोर भाषण करताना मास्क काढल्याची घटना घडली. त्या बद्दलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यात सार्वजनिक कार्यक्रमात अजित पवार स्वत: आपला मास्क काढताना दिसत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर लोकांनी अजित पवार यांचा मास्क नसलेला चेहरा पाहिला आहे. अजित पवार नेहमीच मास्कबद्दल सर्वांना कठोर पालन करण्याचे निर्देश देताना दिसायचे.
“मी कधी मास्क काढायचं ऐकत नाही, मात्र मराठवाडा (Marathwada) माझी सासुरवाडी असल्यानं मला ऐकावं लागतंय” असं म्हणत अजित पवार यांनी आपला मास्क काढला. अजित पवार भाषण करत असताना मास्क काढत नाहीत, त्यावेळी उपस्थितांकडून अनेकदा त्यांना मास्क काढण्याचं आवाहन केलं जातं मात्र ते मास्क काढत नाहीत. मात्र आज अखेर त्यांनी मास्क उतरला आणि मिश्कील शैलीत भाष्य देखील केलं.
अजित पवार आज बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती शुभारंभ कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President) तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आ. प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke), आ. संदीप क्षीरसागर (MLA Sandip Kshirsagar) यांची उपस्थिती होती.
( Deputy Chief Minister Ajit Pawar breaks rules in Beed district; Because knowing is a shock …! )