ऐन दिवाळीत शेतकरी संकटात; कापुस खरेदीवर प्रश्न

ऐन दिवाळीत शेतकरी संकटात; पणन महासंघाच्या कापूस प्रक्रिया टेंडरवर जिनिंग मालकांचा बहिष्कार
किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) हंगाम 2019-20 चे अनेक जिनिंग मालकांचे बिल पणन महासंघाने अदा केलेले नाही. पणन महासंघाच्या कापूस cotton प्रक्रिया टेंडरवर जिनिंग मालकांनी बहिष्कार टाकल्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे कापुस cotton खरेदी केंद्र सुरु होण्यास विलंब लागत असून पणन महासंघाने तात्काळ तोडगा काढून कापुस खरेदी सुरु करावी अशी मागणी होत आहे.
मार्च महिन्यात covid-19 मुळे मार्चमध्ये खरेदी बंद करण्यात आली. याच काळात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन लागू झाले. यानंतर शासनाकडून मे मध्ये कापुस खरेदी चालू करण्यात आली. जिनिंग मालकाकडे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा पूर्ण नसताना सुद्धा covid-19 या महामारी च्या काळात सुद्धा आपला आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून शासनाच्या निर्णयानुसार खरेदी चालू ठेवून शेतकऱ्यांचा कापूस संपेपर्यंत जून जुलै-ऑगस्ट मध्ये खरेदी केली. शेतकऱ्यांचा कापूस cotton पावसात भिजून जिनिंगवर त्याचे नुकसान झाले. हे नुकसान होत असताना जिनिंग मालकांनी वेळोवेळी पणन महासंघाला कळविले. परंतु त्यांनी कसलीही दखल घेतली नाही. पणन महासंघाचे प्रतिनिधी म्हणून ग्रेडर त्याठिकाणी काम पाहत होते. त्यांना सुद्धा होणारे नुकसान कळत होते. परंतु त्यांनी सुद्धा खरेदी थांबवली नाही आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये जिनिंगचे बिल पेंडिंग असून पणन महासंघाने नुकसानीपोटी जिनिंग मालकाच्या बिलातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिनिंग मालकांना मान्य नाही. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेवर सर्व जिनिंग चालकांनी बहिष्कार टाकलेला आहे. यामुळे कापूस cotton खरेदी लांबणीवर पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी यामध्ये पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून शेतकऱ्यांचा कापूस लवकरात लवकर विकून त्यांना त्यांच्या मालाचा मोबदला मिळेल आणि त्यांची दिवाळी Diwali सण साजरा होण्यास मदत होईल.