धारुरमध्ये वाढ … बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.21 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 4221 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 115 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4106 जण निगेटिव्ह आली आहेत. आज धारुर शहरातील जाधव गल्लीत 7 तर तालुक्यात 10 असे 17 रुग्ण आढळले आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-12, अंबाजोगाई-6, आष्टी-44, धारुर-17, गेवराई-5, केज-13, माजलगाव-3, परळी-1, पाटोदा-8, शिरुर-2, वडवणी-4 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला चांगलेच वेढले आहे. या कठीण काळात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी चांगली कामगिरी केली. दरम्यान, काल अजित कुंभार यांची बदली मुंबई येथे झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी राज्यात 4 हजार 365 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.तर राज्यात 105 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. राज्यातील मृत्यू दर 2.11 टक्क्यांवर आला आहे. राज्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून लसीकरणाला (vacccination) मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता आज राज्यात 6 हजार 384 रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. राज्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता राज्यात आतापर्यंत 62 लाख 21 हजार 305 बाधित रुग्णांनी (Corona Positive) कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे मागील काही महिन्यांपासून वाढत आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.97 इतका झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!