फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या फिरत्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यास सुरुवात झाली असुन आज धारुर शहरात याचा शुभारंभ तहसीलदार व्हि. एस. शिडोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
नागरिकांना फळे व भाजीपाला सुरळीत पुरवठा करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. धारुर नगर परिषद कार्यालयासमोर फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन तहसीलदार व्हि. एस. शिडोळकर यांच्या यांच्या हस्ते आज दि.१४ मंगळवार रोजी करण्यात आले. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला याचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता कृषी विभागाकडे नोंदणी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ, शेतकरी गट यांना घरोघरी फिरून फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना व वाहन परवाना देण्यात येत आहे. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ यांना दिलेल्या परवाना नुसार सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नेमून दिलेल्या विभागात फिरून भाजीपाला विक्री करण्यात येणार आहे. यावेळी प्रभारी मुख्याध्याधिकारी सुहास हजारे, नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, तालुका कृषि अधिकारी शरद शिनगारे, समिती सदस्य सुर्यकांत जगताप, अंगद डापकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.