आजही रुग्ण संख्येत वाढ कायम… जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट.

बीड दि.17 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्या दिडशे ते दोनशेच्या मध्ये खेळत आहे. तिसऱ्या लाटेची जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. यातच बीड जिल्ह्याची रुग्ण संख्या अद्यापही शंभरच्या खाली आलेली नाही. आज शनिवारी जिल्हा प्रशासनाकडे 4818 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 181 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4637 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Covid condition of Beed district is worrisome … see today’s Corona update.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-26, अंबाजोगाई-8, आष्टी-52, धारुर-7, गेवराई-16, केज-15, माजलगाव-8, परळी-0, पाटोदा-16, शिरुर-16, वडवणी-17 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्या गेल्या काही दिवसांपासून दिडशेच्या पुढे गेली आहे. मागच्या पाच ते सहा दिवसात संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंतेत भर पढली आहे. आज पुन्हा 181 रुग्ण आढळली आहेत.
दरम्यान, गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे 38 हजार 079 नवे रुग्ण सापडलेत. यात महाराष्ट्रात 7 हजार 761 रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्र कोरोना रुग्ण मिळण्याच्या बाबतीत अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये गेल्या चोवीस तासात 13 हजार 750 कोरोना रुग्ण सापडलेत. केरळ आणि महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश-2 हजार 345, तामिळनाडू- 2 हजार 312 आणि ओडिशा- 2 हजार 070 एवढे कोरोना रुग्ण सापडलेत.
विशेष म्हणजे देशातले 74.16 टक्के रुग्ण हे फक्त वरील पाच राज्यात सापडलेत. त्यात एकट्या केरळची भागीदारी ही 36 टक्के एवढी आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी झालेलं नाही. गेल्या चोवीस तासात 560 जणांना जीव गमवावा लागलाय.