बीड जिल्ह्यात धबधबा पाहण्यासाठी आलेली दोन मुले वाहुन गेले… एकाला वाचवण्यात यश, एक बेपत्ता.

बीड दि.7 सप्टेंबर – गेल्या दोन दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पुरात (flood) वाहुन जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. आज दुपारी कपिलधार येथील धबधबा पाहण्यासाठी दुचाकीवरुन गेलेले दोन अल्पवयीन मुले सिमेंट रोडच्या पुलावरुन वाहून गेल्याची घटना दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली. यातील एकाला वाचवण्यात यश आले असून एकाचा शोध घेणे सुरु आहे.

(Two children who came to see the waterfall in Beed district were carried away … One was rescued, one went missing.)

काल दि.6 सोमवारी वडवणीत तीन जणांचा पुरात वाहुन मृत्यू झाला. तर धारुर (Dharur) तालुक्यात मोरफळी येथे पुराच्या पाण्यात बैल वाहुन मृत झाल्याची घटना घडली. जोरदार पावसामुळे (heavy rains) जिल्ह्यातील पर्यटनस्थळी गर्दी होवू लागली आहे. आज दुपारी कपिलधार येथील धबधबा (waterfall) पाहण्यासाठी दुचाकीवरुन गेलेले दोन अल्पवयीन मुले सिमेट रोडच्या पुलावरुन वाहून गेल्याची घटना दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार यशराज कुडके (वय 17 वर्षे, रा. कबाड गल्ली, बीड) आणि त्याचा मित्र ओंकार विभुते (वय 17 वर्षे रा. माळीवेस बीड) असे कपिलधार (Kapildhaar) येथे फिरायला गेलेल्या मुलांचे नावे आहेत. यातील ओंकार विभुते याला वाचविण्यात ग्रामस्थांना यश मिळाले आहे.

कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला यात एकाला वाचविण्यात यश मिळाले मात्र दुसरा मुलगा अद्यापही बेप्पता आहे. बीडचे बचाव पथक घटनास्थळी शोध घेत आहे. बीड ग्रामीण पोलिस (Police) ठाण्याचे ठाणेप्रमुख संतोष साबळे घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!