माझं गाव

दहा वर्षीय मुलीची आत्महत्या ; धारुरमधील घटना.

45 / 100

किल्लेधारूर दि.8 अॉगस्ट – दहा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे रविवारी धारुरात उघडकीस आले. शहरातील केज रोडवर राहणाऱ्या एका सालगड्याच्या घरात सदर प्रकार घडला आहे. भाग्यश्री भगवान गांगरडे (वय 10) असे मृत मुलीचे नाव आहे.
(Ten-year-old girl’s suicide; Incident in Dharur.)

याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर (Dharur) शहरातील केज रोडवर भगवान गांगरडे यांचे कुटूंब सालगडी म्हणून शेतातच राहतात. रविवारी भगवान गांगरडे आपल्या पत्नीसह शेतात कामावर गेले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली असून हे तिन्ही बहिण भावंड यावेळी घरीच होते. काही वेळानंतर घरातील आडूला यातील भाग्यश्री या दहा वर्षीय मुलीने गळफास घेतला.

घरातील इतर दोघा बहिण भावाच्या सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीच्या आई वडीलांना सदर प्रकाराची माहिती दिली. घटनेची माहिती धारुर पोलिसांना (Dharur Police) मिळताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. सदर मुलीने आत्महत्या (suicide) का केली याचे कारण समोर आले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!