शैक्षणिक

दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहिर; पहा कधी होणार परीक्षा.

मुंबई दि.21 डिसेंबर – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (HSC Exam time table) जाहीर करण्यात आले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.

(Tenth and twelth examination schedule announced; See when the exam will be.)

बोर्डाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) यापूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

आता बोर्डाकडून परीक्षेचं प्रत्येक विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in याअधिकृत वेबसाईटवर पहायला मिळेल.

दहावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक:
१५ मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
१६ मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा
१९ मार्च – इंग्रजी
२१ मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा)
२४ मार्च – गणित भाग – १
२६ मार्च – गणित भाग २
२८ मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर १
४ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर २
संपुर्ण वेळापत्रक
http://mahahsscboard.in.Wishing या संकेतस्थळावर संपुर्ण वेळापत्रक आहे.

बारावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक :
४ मार्च – इंग्रजी
५ मार्च – हिंदी
७ मार्च – मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलुगू इ.
८ मार्च – संस्कृत
९ मार्च – वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
१० मार्च – भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र
११मार्च – चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
१२ मार्च – रसायनशास्त्र
१४ मार्च – गणित आणि संख्याशास्त्र
१५ मार्च – बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
१६ मार्च – सहकार
१७ मार्च – जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास
१९ मार्च – भूशास्त्र, अर्थशास्त्र
२१ मार्च – वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म
२२ मार्च – अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!