शेती विषयक

पीएम किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर; असे तपासा आपले खाते.

नवी दिल्ली दि.2 जानेवारी – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएम किसान सन्मान (PM Kisan Scheme) योजनेअंतर्गत दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांनी नववर्षाच्या दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकरी बाधवांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले.

(Tenth installment of PM Kisan Sanman Yojana on farmers’ account; Check your account like this.)

देशभरातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20 हजार कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजारांचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यातील 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांच्या दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात (Bank account) जमा करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील  1.05 शेतकऱ्यांना लाभ
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1.05 शेतकऱ्यांच्या खात्यात आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 3828 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.

या आधी अहमदनगर जिल्ह्याला मिळाले सर्वाधिक पैसे
पीएम किसान योजनेचे या आधी 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 988.98 कोटी रूपयांची रक्कम अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यानंतर दोन नंबरला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 912. 26 कोटी रूपये मिळाले आहेत. तर तीन नंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 803.08 कोटी रूपयांचा लाभ झाला आहे. त्या खालोखाल सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 752.84 कोटी रूपयांचा लाभ झाला आहे.

असे चेक करा तुमच्या खाते
PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.

खात्यावर पैसै जमा झाले नाहीत तर येथे करा तक्रार
पीएम किसान टोल फ्री नंबर : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन नंबर : 155261
पीएम किसान लैंडलाइन नंबर : 011—23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109
ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!