घात-अपघात

terrible accident… महाराष्ट्रात पुन्हा भीषण अपघात ; 9 जण ठार तर 20 जण जखमी.

62 / 100 SEO Score

मुंबई दि.4 जुलै – terrible accident मुंबई – आग्रा महामार्गावर (Highway ) पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात हॉटेलमधील ग्राहक व वेटरहह 9 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक माहिती असून 15 ते 20 जण जखमी असल्याचे कळते. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.

( terrible accident… Another terrible accident in Maharashtra; 9 people were killed and 20 people were injured. )

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर (samrudhi Mahamarg) झालेल्या भीषण अपघातानंतर आज मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला. शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. पळासनेर गावाजवळ आज (दि.4) साधारण दुपारी 12 वाजताच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन (Highway) जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात हॉटेलमध्ये थांबलेल्या नागरीकांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!