महाराष्ट्रात पहाटे पुन्हा भीषण अपघात… मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू.

वर्धा दि.25 जानेवारी – परभणी येथील अपघाताच्या घटनेस चोविस तास उलटत नाही तोच चारचाकी एसयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात (Accident) वर्ध्यात झाला आहे. अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पहाटे एकच्या सुमारास हा अपघात झाला.

(Terrible accident in Maharashtra … Seven medical college students died on the spot.)

देवळी येथून वर्ध्याला (Wardha) येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून वाहन खाली कोसळलं. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडले. या भीषण अपघातातील सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी (Sub Divisional Police Officer) पियुष जगताप, सावंगी पोलिस निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व तरुण हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे (Medical College) विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

रविवारी रात्रीपासून राज्यात भीषण अपघाताची मालिका सुरु आहे. पुणे-नगर महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे मराठवाड्यातील परभणी (Parbhani) जिल्ह्यात सोमवारी सकाळी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता.

अवघ्या चोविस तासांत महाराष्ट्रात (Maharashtra) रस्ते अपघातात आठ बळी गेले होते. अशातच आज मंगळवारी पहाटे आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे. वर्ध्यातील कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आता गेल्या 48 तासांत अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या तब्बल 15 झाली आहे.

दरम्यान, वर्धा अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पोलीस (Police) आणि प्रशासन अपघातप्रकरणी पुढील तपास करत असून सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर या अपघातानं मोठा आघात झाला आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!