अपघातात धारुरच्या एकाचा समावेश; पहा अपघातातील जखमी व मृतांची नावे.

अंबाजोगाई दि.9 जानेवारी – अंबाजोगाई ते लातूर (Ambajogai Latur) रोडवर नंदगोपाल डेअरी नांदगाव फाट्याजवळ आज सकाळी साडे आठ वाजता लातूरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad) आगाराच्या एम. एच. 20 बीएल 3017 या एसटी बसचा समोरून येणाऱ्या औरंगाबाद येथून मशनरी घेऊन हैदराबादकडे जाणाऱ्या केए 56- 5494 या ट्रकचा मोठा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असुन चौदा जण जखमी झाले आहेत.
(The accident involved one of Dharur; See the names of the injured and dead in the accident.)
जखमीपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती (SRTR) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भिषण होता की बस आणि ट्रकच्या चक्काचुर झाला आहे. पाऊस पडल्यामुळे व थंडीमुळे पहाटेपासून मोठे धुके पसरले होते. त्यामुळे एसटी बस (ST Bus) चालक समोरील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादात ट्रकवर डाव्या साईडला आदळल्यामुळे व जोराच्या धडकेमुळे बस फाटत जाऊन दोन्ही वाहनांचा चकणाचुर झाला आहे.
अपघातातील मृतांची नावे
या अपघातात आदिल सलीम शेख (वय 29) राहणार अंबेजोगाई , नलिनी मधुकर देशमुख (वय 72) ज्योती नगर औरंगाबाद, औरंगाबाद आगाराचा कांचनवाडी येथील चंद्रशेखर मधुकर पाटील बस वाहक हे तिघे जण मयत झाले. असुन चौथा एकोणतीस वर्षाच्या मयताची ओळख पठली नाही. यामध्ये चार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जखमींची नावे
जखमी प्रवाशांत सुधाकर थोरात (वय 50) रा. पांगरी, ता.धारूर (Dharur), रंगनाथ चव्हाण (वय 67) लातूर, अलादीन अमीर पठाण (वय 20) राहणार निलंगा, अस्मत रहीम पठाण (वय 38) रा. लातूर, जियान रहीम पठाण (वय 10) रा. लातूर, भागवत निवृत्ती कांबळे (वय 55) रा. लातूर, योगिता भागवत कदम (वय 40) लातूर, संगीता बजरंग जोगदंड (वय 44) लातूर ,दस्तगीर आयुब पठाण (वय 19) रा. निलंगा, प्रकाश जनार्दन ठाकूर (वय 55) रा. शेंडी ,सुभाष भगवान गायकवाड (वय 43) रा. पिंपळगाव, आयन फय्युम पठाण (वय 13) रा. लातूर, माधव नरसिंगराव पठारे (वय 65) रा. जालना, बळीराम संभाजी कराड (वय 22) रा. खोडवा सावरगाव हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी पाच जण गंभीर आहेत.
या अपघाताची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात, पीएसआय शिवशंकर चोपणे, एएसआय लक्ष्मण बिडगर,मुन्शी महादेव आवले,पांडुरंग श्रीमंगले, राजाभाऊ थळकरी यांच्यासह पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना लवकरात लवकर घटनास्थळावरून वाहना मार्फत स्वाराती रुग्णालयात पाठवले व तेथून स्वाती रुग्णालय येथे येऊन जखमींची विचारपूस व अडचणी सोडवण्याचे काम केले.
दुर्दैवी इंजिनिअर
अंबाजोगाई येथील सदर बाजार येथे राहणाऱ्या इंजिनीअर आदिल सलीम शेख हा काल बहिणीस लातुर येथे सोडावयास गेला होता. एकुलत्या एक 29 वर्षीय इंजीनियरचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला असुन पत्नीच्या हातावरील मेंहदी निघण्या अगोदरच तिच्या वाटेला दु:ख आले आहे. कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.