मोठी बातमी… ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस कोठडी; इतर 109 आरोपीना न्यायालयीन कोठडी.

मुंबई दि.9 एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते ( Adv Gunratna Sadavarte) यांना मुंबई येथील किला कोर्टाने (Mumbai Fort Court) दोन दिवसांची पोलिस कोठडी (custody) सुनावली आहे. तर उर्वरित 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी (judicial custody) देण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगड व चप्पलफेक करुन हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) हल्लेखोर 107 एसटी कर्मचाऱ्यांसह (ST employees) कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तें यांना रात्री अटक केली आहे. आज या सर्व आरोपीनी मुंबई फोर्ट न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी दोन्ही पक्षांनी बाजू मांडली. न्यायालयात सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. सरकारी पक्षाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली आहे. तर सदावर्तें यांचे वकिल महेश वासवानी यांनी सदावर्ते यांचा जामिन कोर्टात सादर केला. मात्र, या जामीन अर्जाला सरकारी वकीलांनी विरोध केला. कामगारांच्या कालच्या हिंसक आंदोलनाचे सिसीटीव्ही फुटेज (CCTV footage) घटना स्थळावरुन जप्त केले आहेत. यामागे काही लोकांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यांत दोन पोलिस जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी 109 आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. त्यापैकी अनेकांनी खोटी नावे सांगितली असून पत्तेही चुकीचे सांगितले आहेत. त्यामुळे, त्यांची पुर्ण नावे आणि खरे पत्ते शोधून काढायचे आहेत. या अटक कर्मचाऱ्यांत खरंच एसटी कर्मचारी (ST workers) होते की, बाहेरचे कोणी होते, याचाही तपास करायचा आहे. म्हणून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
( The big news … Adv. Gunaratna Sadavarte to police custody; The other 109 accused were remanded in judicial custody. )