अपघात वार… रूग्णवाहिका व कारच्या समोरासमोर धडकेत एक जागीच ठार; ट्राली घरावर पलटी होऊन महिलेचा मृत्यू.

बीड दि.30 नोव्हेंबर – बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर बीडवरून कोल्हापुरकडे जात असलेल्या भरधाव कारने नगरवरून बीडकडे जात असलेल्या रूग्णवाहिकेला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार मधील एक जण जागीच ठार झाल्याची तर साखर कारखाण्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली पत्राच्या घरावर पलटी होऊन घरातील 55 वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडल्या आहेत.
(Accidental blow … killed in a head-on collision between an ambulance and a car; Woman dies after trolley overturns at home.)
रात्री बीड (Beed) तालुक्यातील मांजरसुंभ्याजवळ स्कार्पिओ गाडीचा अपघात होवून एक जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आज मंगळवारी सकाळीही अपघात झाला. यात एक जण ठार तरा अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्याना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरील घटना सकाळी 8.30 दरम्यान बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर (National Highway) सुर्डी फाटा ता.आष्टी येथे घडली. अवधुत नंदकुमार गरगटे रा.इचलकरंजी वय 31 वर्ष असे अपघात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सोमवारी दुपारी पुण्याला रूग्ण घेऊन गेलेली रूग्णवाहिका (Ambulance) रूग्ण सोडुन (MH.20,EG.5130) बीडला जात असताना बीडवरून कोल्हापुर कडे जात असलेली कार (MH.09 BM.5986) ही भरधाव वेगात असल्याने सुर्डी फाट्यावरील वळणावर समोरासमोर दोनही वाहनाची जोराची धडक झाली. झालेल्या अपघातात अवधुत गरगटे हा जागीच ठार झाला असुन अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्याना तातडीने अहमदनगर (Ahemadnagar) येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रूग्ण वाहिका चालक संतोष सुरवसे रा.बीड हा किरकोळ जखमी झाला आहे.
उसाची ट्राली घरावर पलटी होऊन उसा ढिगाऱ्या खाली दबून महिलेचा मृत्यू; मुलगी गंभीर जखमी
माजलगाव – माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील खाजगी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर च्या ट्रालीची पत्राच्या घरावर पलटी होऊन घरातील 55 वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे 30 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 च्या सुमारास घडली.
पाथरी (Pathri) तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतकऱ्याचा ऊस माजलगाव येथील खाजगी साखर कारखान्याला गळपास जात होता. 30 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 च्या सुमारास शेतातुन उसाची ट्राली भरून ट्रॅक्टर बाभळगाव जवळून जात असताना उसाची ट्राली रस्त्याच्या कडेला एका पत्राच्या घरावर पलटी झाली. या घरात पलंगावर झोपलेल्या पारुबाई रंगनाथ पवार (वय 55) आणि त्यांची नात शिवानी संजय जाधव (वय 8 वर्ष) या दोघी ऊसाच्या ढिगा खाली गाढल्या गेल्या. पहाटे 5 ची वेळ असल्याने दोघी गाढ झोपलेल्या होत्या तर त्यांची मुलगी पुष्पा पवार (वय 27) ही पलंगाच्या खाली झोपली होती.
अपघात (Accident) झाल्यानंतर गावातील लोकानी घटनास्थळी धाव घेऊन घरावर पडलेल्या उसाच्या मोळ्या बाजूला काढल्या. यावेळी परुबाई पवार यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची नात शिवानी जाधव जखमी झाली होती. तीस तातडीने परभणी (Parbhani) येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेत बाजूला झोपलेली पुष्पा पवार ही महिला बालंबाल बचावली आहे.