पुजा चव्हाण प्रकरणी भाजपाचा अधिवेशन चालू देणार नसल्याचा तर चव्हाण कुटुंबाची सामुहिक आत्महत्येचा इशारा

बीड: दि.२६ – मागील काही दिवसांपासून टिकटॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा (Pooja Chavan suicide case) मोठा गाजावाजा केला जात आहे. या प्रकरणात राज्यातील वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्याने मोठी खळबळ माजली होती. रोज काही क्लिप्स, फोटो समोर येत आहेत. अजूनही या प्रकरणाचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले नाही. अशातच आता पुजाच्या कुटूंबियांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बदनामीमुळे सामुहिक आत्महत्या करण्याची धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई न झाल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा दिला.

(The BJP convention will not continue in the Puja Chavan case, but the Chavan family warns of mass suicide)

पुजा चव्हाणच्या कुटूंबियांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आज धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व प्रकरणात कुटुंबाची बदनामी होत आहे. ती लवकर थांबली पाहिजे नाहीतर आत्महत्या करेण असं पुजाच्या वडीलांनी सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून रोज नवनवीन फोटो आणि क्लिप्स समोर येत आहेत यामुळे कुटूंबाची बदनामी होत आहे असंही पुजाच्या वडीलांनी सांगितलं.

पुजाची आई मंडूबाई चव्हाण यांनी अरुण राठोडला ओळखत नसल्याचे सांगितले. पुढे बोलताना मंडूबाई यांनी कुटूंबात इतर सदस्यही आहेत याची जाणीव ठेवावी व राजकारण बंद करावं नसता सर्वांना आत्महत्या करावी लागेल असे सांगितले. पुजाच्या बहिणीने माझ्या बहिणीचे इतर नेत्यांसोबतही फोटो असल्याचे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रीतम मुंडे यांचा उल्लेख केला. त्या महिला असल्यामुळे त्यांच्याशी नाव जोडले जात नसल्याचा आरोप केला.

दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार अतुल भातकळकर यांनी याप्रकरणी कारवाई न झाल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रुप आल्याने कुटूंबियांनी राजकीय नेत्यांसह माध्यमावर जाहिर नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!