पुरात वाहुन गेलेल्या माजी आमदाराच्या मुलगा व नातवाचे मृतदेह सापडले; मराठवाड्यात पावसाचा कहर…

मुखेड दि.8 सप्टेंबर – मुखेड जि.नांदेड शहरा लगत असलेल्या मोतिनदीच्या पुरात काल एका चारचाकीत वाहून गेलेले राठोड कुटूंबातील दोन जणांची मृतदेह आज सकाळी नाल्यापासून पाचशे मीटर अंतरावर सापडले आहेत. भगवानराव राठोड (65) व संदीप राठोड (38) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह बेरळी शिवारात आढळून आली आहेत. मराठवाड्यात पावसाचा कहर पाहायला मिळत असून बीड जिल्ह्यात पुरात वाहून मृत पावलेल्यांची संख्या चार आहे.

(The bodies of the former MLA’s son and grandson were found washed away in the floods.)

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील 80 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. गावालगत असलेल्या नदी-नाल्यांसह ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. मुखेड शहरापासून जवळ असलेल्या मोती नाल्यात कार वाहून गेल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. या कारमध्ये आमदार डॉ. तुषार राठोड यांचे चुलतभाऊ तथा माजी आमदार किशन राठोड यांचा मुलगा भगवान राठोड आणि त्यांचा मुलगा संदीप राठोड हे दोघे पुरात वाहून गेले. सदरील प्रकाराचा व्हिडीओ सोशल माध्यमातून (social media) व्हायरल झाला होता.

या गाडीतील चालक उद्धव देवकत्ते यांनी पुरात वाहत असताना झाडाचा आसरा घेत स्वतःचे प्राण वाचविले. दरम्यान, आज सकाळी बेरळी शिवारात दोघांचे मृतदेह (dead body) आढळून आले. त्यांच्यावर आज दि.8 बुधवारी दुपारी 2 वाजता कमळेवाडी ( ता.मुखेड ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अशी घडली घटना…
मुखेड (Mukhed) तालुक्यातील कमळेवाडी येथुन पिता-पुत्र नोकर उद्धव देवकते याला घेवून कारने कमळेवाडी येथून पांडुर्णी मार्गे मुखेडकडे येत होते. सकाळी कार मुखेडनजीक असलेल्या मोती नाल्याजवळ आली असता, संदिप राठोड यास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्याने पुलावरू कार नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाण्याच्या प्रवाहात कार वाहून गेली.

बचाव पथकाला (Rescue squad) वाहून गेलेली कार सापडली होती, मात्र राठोड पिता-पुत्र सापडले नव्हते. दरम्यान, रात्र झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळपासून पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली. दरम्यान आज, वाहून गेलेल्या या पिता- पुत्रांचा मृतदेह सापडला आहे. नाल्यापासून 500 मिटर अंतरावर दोन्ही मृतदेह सापडले असून भगवान राठोड आणि संदीप राठोड यांचेच ते असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!