दोन रोपांची किंमत १ लाख ६८ हजार…. झाली पोलिस कारवाई

बीडः दि.१६(प्रतिनिधी)- बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यात १ लाख ६८ हजार तिनशे रुपये किंमत असलेल्या दोन गांजाची रोप (Marijuana plant) पोलिसांनी (Police) छापा (Raid) मारत जप्त केली असुन याप्रकरणी एका जणां विरुध्द पोलिसात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
राज्यात सध्या अंमली पदार्थाच्या विरोधात जोरदार मोहिम सुरु आहे. विशेषतः मुंबई गेल्या महिनाभर अंमली पदार्थ विरुध्द कारवाईमुळे बरीच चर्चेत आहे. याच काळात बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यात एका शेतकऱ्यांने चक्क घराच्या बाजुलाच गांजाचे झाड लवल्याचा प्रकार उघडकीस आला. आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील सचिन साहेबराव जाधव असे शेतकऱ्यांचे नाव आहे. सदरील दोन्ही रोप अंभोरा पोलिसांनी (Police) छापा (raid) टाकून जप्त केली आहेत. सदरील गांजाच्या झाडाचे (Marijuana plant) वजन १६ किलो ८०० ग्रॕम असून त्याची किंमत १ लाख ६८ हजार ३०० असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपी शेतकऱ्यांस पोलिसांनी (Police) अटक केली असून पोलिस उपनिरिक्षक राहुल लोखंडे पुढील तपास करीत आहेत.