धारुर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या; महिन्यापुर्वीच केले मुलीचे लग्न.

किल्लेधारूर दि.19 जुन – धारुर (Dharur) तालुक्यातील सोनिमोहा येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या ( Farmer commits suicide ) केली. दिड एकर जमिन यात कुंटूबाचा खर्च व एक महिन्यापूर्वी झालेल्या मुलीच्या लग्नाच्या कर्जाचा बोजा कमी कसा करायचा या चिंतेत सदर शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सोनिमोहा येथे राहत्या घरी घडली.
सिताराम गंगाधर साठे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सिताराम साठे यांना सोनिमोहा येथे दिड एकर जमिन आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दोन्ही मुलीचे लग्न झाले असून यातील एका मुलीचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. शेती व उसतोडणी करूनही झालेला कर्जाचा बोजा कमी होत नसल्याने मागील काही दिवसा पासून सिताराम साठे हे आर्थिक अडचणीत होते.
शनिवारी सायंकाळी घरातील सर्वजन पेरणीसाठी शेतात गेल्याचे पाहून त्याने राहत्या घरातच लोखंडी आडूला गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा पोलीसांनी (Police) पंचनामा केला आहे. धारूर ग्रामिण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून रविवारी सकाळी सोनिमोहा येथे अंत्यविधी करण्यात आले. आत्महत्या प्रकरणी पुतणे प्रकाश साठे यांच्या खबरीवरून धारूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
( Farmer commits suicide in Dharur taluka; The girl got married a month ago. )