दुसऱ्या दिवशीही धारुरात तरुणाची आत्महत्या …..

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) काल तालुक्यातील आसरडोह येथे बेरोजगारीच्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी असताना आज शहरातील एका इलेक्ट्रिक दुकानात आवरगाव येथील तरुणाने आत्महत्या केल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील अंबेजोगाई रोडवर असलेल्या इलेक्ट्रिक दुकानात आज सकाळी खेळण्यासाठी मित्राला बोलावण्यास गेलेल्या मित्रांना प्रतिसाद मिळत नसल्याने सदरील घटना उघडकीस आली. जय प्रदीप जगताप (२५) असे तरुणाचे नाव आहे. काल दि.२७ रविवारीही तालुक्यातील आसरडोह येथे एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी असताना शहरात आज ही दुसरी घटना उघडकीस आली. मयत तरुणावर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन प्रेत ताब्यात देण्यात आले असून पोलिस (Police) ठाण्यात आकस्मिकचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस (Police) उपनिरिक्षक गोविंद बाष्टे यांनी दिली. आवरगाव गावात सदरील आत्महत्येमुळे शोकाकुल वातावरण असून आवरगावसह धारुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!