केजमध्ये सत्तेची सुत्रं जूळली; जनविकासच्या हातात काँग्रेसचा हात.

केज दि.26 जानेवारी – केज (Kaij) नगरपंचायची सत्तेचे समिकरण जुळले असून जनविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Indian National Congress) यांनी एकत्र येण्याचा निर्णय जाहिर केला. यावेळी आम्ही गावातील आघाडी व काँग्रेस गावासाठी एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली.
(The Kaij matched the formulas of power; The hand of Congress in the hand of people’s development.)
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर पंचायत (Municipal council) निवडणूकीत केजवासीयांनी त्रिशंकू कौल दिला. या निवडणूकीत जनविकास आघाडीला 8, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला 5, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 3 तर स्वाभिमानीला 1 जागा मिळाली. बहुमतासाठी जनविकास आघाडीला एका जागेची आवश्यकता असल्यामुळे उत्कंठा वाढली होती.
यामुळे सत्तेची चावि स्वाभिमानीच्या एका सदस्याच्या हाती असल्याची चर्चा होती. मात्र गेल्या दोन दिवसांत शहरातील जनविकास आघाडी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांत चर्चा होवून आज पत्रकार परिषद (Press conference) घेत निर्णय जाहिर करण्यात आला आहे.
आज शिवनेरी येथे हारुन इनामदार, आदित्य पाटील, अंकुशराव इंगळे, मौला सौदागर, पशुपतीनाथ दांगट यांनी पत्रकार परिषद घेऊन गावासाठी गावचे सरकार व केजच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे जाहिर केले. पाच वर्ष आम्ही खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन केजला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही यावेळी सांगण्यात आले.
या निवडणूकीत भाजपाकडून (BJP) निवडणूक लढवली नसतानाही दोन दिवसांपुर्वी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाजपाचा नगराध्यक्ष होणार असे भाकीत केले होते. तर काल त्यांनी केज येथे एका उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली होती.
आता या जनविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नव्या समीकरणानंतर नगराध्यक्ष (mayor) आघाडीचा व उपनगराध्यक्ष काँग्रेसचा असणार असे संकेत मिळत आहेत. मात्र पत्रकार परिषदेत याप्रश्नाला बगल दिल्याचे दिसून आले.