बिबट्या अजूनही मोकाट … लोकांत दहशत कायम

बीडः दि.१(प्रतिनिधी) आष्टी (Ashti) तालुक्यातील वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) आज मंगळवारीही वनविभागाच्या सापळ्यात अडकला नाही. बिबट्याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांसह जिल्ह्यातील वन कर्मचारी (Forest Department) व बाहेरुन आलेले वन्य जीव व्यवस्थापन (Wildlife Management) तज्ञ कर्मचारी व अधिकारी तळ ठोकून आहेत. आजही बिबट्याच्या हल्ल्याचा प्रकार किंवा दिसुन आल्याची घटना कोठेही घडली नाही. यामुळे परिसरात दहशत कायम आहे.

बिबट्याने (Leopard) आष्टी (Ashti) तालुक्यातील पारगाव, सुरडी येथील दोन हल्ले करुन मानवी बळी घेणारा व यानंतर गहुखेल येथे शेळीची शिकार करुन दोन मुलांवर चाल केली, सुरडी येथेही एका शेतकऱ्यावर हल्ला केला तर पांडुळगव्हाण येथेही एका शेतकऱ्यावर हल्ला असे दिवसभर पाच हल्ले करुन एका महिलेसह शेळीची शिकार करणारा बिबट्या (Leopard) आज दुसऱ्या दिवशीही आढळून आला नाही. सुरडी, किन्ही, मंगरूळ, पारगाव जो.,गहुखेल, येथे मानव तसेच जनावरांवर हल्ला केलेल्या बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभाग (Forest Department) प्रयत्नशील आहे. औरंगाबाद, अमरावती, नांदेड, बीड जिल्ह्यातील सर्व वनविभाग, पुणे येथील रेस्क्यू ॲनिमल पथक, चार वन्यजीव व्यवस्थापना (Wildlife Management) मधील तज्ञ अशा टीमचा यात समावेश आहे. दरम्यान आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. आ. सुरेश धस (Suresh Dhas) यांनी नरभक्षक बिबट्यास जेरबंद करा अथवा शुट करुन दहशत संपवा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!