शहरात दररोज भरतो बाजार; स्थानिक प्रशासन हतबल. युथ क्लबने केली नियोजनाची मागणी.

किल्लेधारूर दि.7 एप्रिल – जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला असताना किल्लेधारूर शहरात दररोज बाजार भरत आहे. याबाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असुन स्थानिक नगर पालिका प्रशासन हतबल होवून याकडे दुर्लक्ष करत आहे. किल्लेधारूर युथ क्लबच्या (Kille Dharur youth club) वतीने नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे सदरील अनाधिकृतरित्या भरणाऱ्या बाजाराचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.
(The market fills the city every day; Local administration is weak. The youth club demanded planning.)
सध्या जिल्ह्यात कोरोना कहर पहावयास मिळत आहे. काल दिवसभरात तब्बल 9 कोरोना बाधित (Corona Positive) दगावल्याची घटना अंबाजोगाई येथे घडली. तर धारुर शहरात एकाच दिवशी 29 कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आली आहेत. याची कसलीही गंभीर दखल घेतली जात नसुन शहरात सोमवार व शुक्रवार रोजी भरणारे बाजार आता जागा बदलून पोस्ट अॉफीस रोड व पिलाजी अॉईल मिल परिसरात रोजच भरत आहे. यामुळे याभागात कोविड नियमांचा भंग करत शेकडोंची गर्दी होत आहे.
शासनाने पालेभाज्या व फळ विक्रेत्यांना फिरुन विक्री करण्याची मुभा दिलेली असताना रस्त्यात सर्रासपणे पालेभाज्या विक्रेते मुजोरी करत असल्याचे दिसत आहे. सदरील प्रकारामुळे अनेक वेळा भांडण व तंटे होत असुन वाहतूकीला अडथळा होत आहे. याबाबत अनेक वेळा नगर पालिका व पोलिस प्रशासनाला माहिती देवूनही गांभिर्याने याकडे पाहिले जात नाही. स्थानिक प्रशासन वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असुन आपत्ती व्यवस्थापन काळात व्यवस्थापनाचा अधिकार दिलेला असताना याकडे दुर्लक्ष करणे कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारे ठरणार आहे.
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडे बाजार भरवण्याची परवानगी द्यावी अशी उपरोधक मागणी सर्वसामान्य जबाबदार नागरिकांतून होत आहे. येथील किल्लेधारूर युथ क्लबच्या (Kille Dharur youth club) वतीने या दोन ठिकाणी भरणाऱ्या अनाधिकृत बाजारास मुळ जागेवर कोविड नियमांचे पालन करुन नियोजन करावे अशी मागणी युथ क्लबचे अध्यक्ष गौतम शेंडगे यांनी मुख्याधिकारी नितिन बागुल यांचेकडे केली आहे. यावेळी युथ क्लबचे सुरेश शिनगारे, सुर्यकांत जगताप, विजय शिनगारे यांची उपस्थिती होती.