आता वीज थकबाकीची नो झंझट; लवकरच येणार प्रीप्रेड स्मार्ट मीटर.

नवी दिल्ली दि.14 अॉगस्ट – देशभरात वीज बिल महिना झाल्यानंतर जनरेट होते. त्यामुळे थकबाकी वाढल्याचे दिसून येते. यामुळे वीज वितरण कंपन्यांवर त्याचा दबाव वाढतच जात आहे. थकबाकीपासून सूटका होण्याच्या दृष्टीने वीज बिल प्रिप्रेड स्वरूपात करण्याचा प्रयत्न आहे. सरकारचे हे पाऊल महत्वपूर्ण मानले जात आहे.

(No hassle of electricity arrears now; The prepaid smart meter will be coming soon.)

सध्या स्मार्ट वीज मीटर देशातील काही निवडक शहरांत उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पहायला मिळते. आता पूर्ण देशातच प्रीप्रेड स्मार्ट मीटरची (Prepared smart meter) व्यवस्था लागू करण्याची तयारी सुरू आहे. वीज मंत्रालयाने (Ministry of Power) सरकारच्या सर्व मंत्रालयांना त्यांनी आपआपल्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची सुचना केल्या आहेत. प्रीपेड मीटरमुळे वीज वितरण कंपन्यांची (Power distribution companies) आर्थिक परिस्थितीत सुधार होण्याची शक्यता आहे.

प्रीपेड मीटर तसेच काम करते जसे की, प्रीपेड मोबाईल! म्हणजेच जितके पैसे मोजले तेवढीच वीज तुम्ही वापरू शकता. देशात सध्या मोजक्याच ठिकाणी प्रीपेड मीटरचा वापर होत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये प्रीपेड मीटर लावल्यानंतर याची अंमलबजावणी संपूर्ण देशात होणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी वगळता सर्व वीज ग्राहकांना टप्याटप्याने प्रीपेड मीटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. अनेकदा ग्राहकांकडून योग्य वेळेत वीज बिल भरणा होत नाही. तसेच थकबाकीही राहते त्यामुळे सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!