Bus accident … धारुर तालुक्यातील चोरांबा परिसरात एकाच दिवशी लालपरीचे तीन अपघात.

किल्लेधारुर दि.8 सप्टेंबर – Bus accident धारुर तालुक्यातील चोरांबा अरणवाडी परिसरात आज दि.8 शुक्रवारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे तीन वेगवेगळे अपघात झाले आहेत. यातील दोन अपघातात प्रवासी जखमी झाले आहेत.
आज दि.8 शुक्रवार हा दिवस एसटी महामंडळासाठी अपघात वार ठरला आहे. धारुर Dharur शहरापासून जवळच असलेल्या घाटपायथ्याला अरणवाडी व चोरांबा या गावात राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी या रस्त्यावर काही तासात बसेसचे तीन अपघात झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चोरांबा फाट्यावर कोंबडी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअप (क्र. एमएच 44 यु 2248) व बसची (क्र. एमएच 13 सीयू 7509) (ST Bus) समोरासमोर धडक झाली. या अपघातात accident अनेक प्रवासी पिकअप चालकासह अन्य एक जण किरकोळ जखमी झाले. यानंतर चोरांबा फाट्यानजीकच एका बसने ST Bus रस्त्यावर चालणाऱ्या बनूबाई विश्वनाथ चव्हाण या महिलेस धक्का दिला. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर तिसरा अपघात अरणवाडी फाट्यावर घडला. कोल्हापूरहून माजलगावकडे जाणाऱ्या बसचा (क्र.एमएच 14 बीटी 2392) धारुरकडे Dharur येत असलेल्या स्विफ्ट कारला (क्र.एमएच 14 सीसी 2333) Car धक्का बसल्याने कारचे नुकसान झाले. यातील पिकअप व बसच्या अपघाताची accident नोंद पोलिसात Police झाली असून अन्य अपघाताची नोंद अद्याप नाही.