उद्या वाजणार शाळेची घंटा; अशी घ्या विद्यार्थ्यांंची काळजी, काय आहेत नियम…

बीड दि.13 फेब्रुवारी – गेल्याच आठवड्यात आठवी ते बारावी वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता उद्या दि.14 सोमवारपासून प्राथमिकचे वर्ग सुरु होत आहेत. गेल्या महिनाभर बंद असलेला शाळेतील बालकांचा किलबिलाट पुन्हा पाहायला मिळणार आहे.
( The school bell rings tomorrow; Take care of students, what are the rules … )
बीड ( Beed ) जिल्ह्यात मागच्या कांही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा (Corona Positive) आकडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे दि.7 फेब्रुवारी पासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले होते. आता प्राथमिक विभागाच्या शाळाही सोमवार दि.14 फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा ( Radhabinod Sharma ) यांनी काढले आहेत.
शिशुगट, बालवाडी व इयत्ता 1 ली ते 7 वीच्या सर्व पालक व विद्यार्थ्यांना पाठविताना मात्र काही काळजी घेण्याचे आवाहन शैक्षणिक संस्थाकडून करण्यात आले आहे. शासन आदेशाप्रमाणे आपली सोमवार दि.14 फेब्रुवारी पासून सर्व खबरदारी घेत शाळा सुरु होत आहेत.
कोरोनासंदर्भात शासनाने ( Covid Guidelines )केलेल्या सुचनांचे पालन करून व योग्य खबरदारी घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून ( Education Department) करण्यात आले. यासाठी खालील सुचनांचे पालन करुन काळजी घ्यावी लागणार आहे.
विद्यार्थी/पालकांसाठी सुचनां.
1) शाळेत येताना मास्कचा वापर करावा.
2)मुलांनी जेवण करुनच शाळेत यावे शाळेत जेवणाचा डब्बा आणु नये.
3)शाळेत योग्य अंतरावरच बसावे याबाबत पालकांनीही पाल्यांना सुचना कराव्यात
4)पाल्यांच्या शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.
5)तोंडाला वारंवार स्पर्श करु नये.
6)सॅनीटायजरचा वापर करण्याची सवय लावणे व सॅनीटायजरची एक छोटी बॉटल नेहमी सोबत ठेवणे
7)मुलांबरोबर पाण्याची बॉटल देणे.
8)आपल्या घरातील सदस्य किंवा विद्यार्थी आजारी असल्यास विद्यार्थ्यास शाळेत पाठवू नये.
9)मुलांनी वर्गात मास्क न काढणे.
10)पालक व विद्यार्थ्यांनी शाळेने वेळोवेळी दिलेल्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.