दुसरी लाट ओसरत आहे … मात्र, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान;

मुंबई दि.19 मे – आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. सध्या कोरोना विषाणू संसर्गाची (Corona virus) दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसर्‍या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांयुक्त सज्ज असलं पाहिजे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं.

(The second wave is receding … However, the important statement of the Chief Minister;)

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे (Oxygen production plant) लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.
त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना संसर्ग (Corona Infection) रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (Oxygen production plant) आणि आरटीपीसीआर (RTPCR) प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे, असं ते म्हणाले. या प्रकल्पाकरीता रिलायन्स फांऊडेशन तर्फे अनंत अंबानी व साईभक्त व्ही. रमणी यांनी आर्थिक सहाय्य केलं आहे.

संस्थानच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. सदर प्लॅन्टची क्षमता 1200 लीटर प्रति मिनिट असून त्याद्वारे साईनाथ रुग्णालयातील 300 बेड करीता ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.

कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिलं. दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याने आपल्याला ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचं आणि प्रोत्साहन देण्याचं धोरण राज्य शासनाने ठरवलं आहे.

श्री साईबाबा संस्थानने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरणार आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, राज्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या पद्धतीने सामना केला त्याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि अगदी उच्च न्यायालयानेही घेतली. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग बाधित होण्याचे प्रमाण दिसून आले तर संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे, त्याचा सामना करण्यासाठी आपण पूर्वतयारी करत आहोत.

कोरोनाच्या या लढ्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस सर्वजण सहभागी असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर (RTPCR) प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळ्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे देखील सहभागी होते. जिल्ह्यात मध्यंतरी रुग्णसंख्या वाढली होती. ती आता घटताना दिसते आहे. चाचण्यांची संख्या वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा कोरोना संसर्ग (Corona Infection) रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!