प्रतिक्षा संपली… मुंलींची बाजी… असा पहा बारावीचा निकाल… सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर.

मुंबई दि.3 अॉगस्ट -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
आज दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांस बारावीचा निकाल पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसचा (Corona virus) प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे (lockdown) दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीर झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन (Online result) पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आउटही काढता येणार आहे. जाणून घ्या बारावीचा निकाल (12Th result) कसा आणि कुठे पाहाल याबाबत…
(The wait is over … see the result of class XII … CBSE class X results announced.)
बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी निकालाबाबत काल अधिकृत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे (evaluation) तयार करण्यात आला आहे.
बारावीचा निकाल या संकेतस्थळावर पाहता येतील
www.maharesult.nic.in
www.maharesult.nic.in
msbshse.co.in
hscresult.11thadmission.org.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
सीबीएसईच्या (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपली.
सीबीएसईकडून दहावीचा निकाल (10th result) आज 12 वाजता जाहीर करण्यात आला आहे. दहावीचे विद्यार्थी cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. शुक्रवारी सीबीएसईकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दहावीचा निकाल कसा तयार करण्यात आला?
निकालासाठी 20 + 80 चे सूत्र तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन केले जाईल, त्यापैकी 20 गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित 80 गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या 80 गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 10 गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, 30 मध्यावधी परीक्षेसाठी आणि 20 प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.