धारुरसह जिल्ह्यात बसची चाके पुन्हा थांबली… प्रवाशांचे हाल.

किल्लेधारूर दि.7 अॉक्टोंबर – एसटी महामंडळाचे (ST corporation) शासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. या समर्थनार्थ काल (दि.6) दुपार पासून संपात धारुरसह बीड (Beed) जिल्ह्यातील सर्व आगारानी सहभाग घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प पडली असून ऐन दिवाळी सुट्टीच्या (Dipawali) काळात कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

(The wheels of the bus stopped again in the district along with Dharur … the condition of the passengers.)

महामंडळाच्या विलिनिकरणाशिवाय इतर मागण्यांची दखल घेवून राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे काही संघटनांनी संपातून माघार घेतली होती. यामुळे ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी बससेवा पूर्ववत झाली होती. मात्र संयुक्त कृती समितीच्या भुमिकेनंतर संघटनेत फुट पडल्याचे दिसून येत होते. धारुर आगारातील बससेवाही सुरु झाली होती.

मात्र आपल्या मागणीवर अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची ठाम भुमिका राहिल्याने बससेवा बंदच होती. यातच उच्च न्यायालयाने संपावर असलेल्या संघटनांना खडसावल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संपावरुन माघार घेण्यापासून ठाम नकार दर्शवला आहे. काही कर्मचारी तर अगदी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत आहेत.

या संपाच्या दुसऱ्या दिवशी धारुर (Dharur) आगार व बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुन्हा एकदा संपात सहभागी होत धारुर व जिल्ह्यातील इतर आगारातील कर्मचाऱ्यांनी काल दि.6 दुपारपासून सेवा बंद केली आहे. आगारातील 278 पैकी आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षक वगळून सर्वच कर्मचारी संपावर असल्याची माहिती धारुर आगारातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय सोनटक्के यांनी दिली.


बीड जिल्ह्यात 8 एसटी आगार (Depot) आहेत. कालपासून या आठही आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून सुरू केलेल्या संपात सहभाग घेतला आहे. यामुळे परिवहन सेवा ठप्प झाली आहे. यातच दिवाळी निमित्त गावाकडे आलेल्या चाकरमान्यासह सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.

खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून लूट होत असून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (passengers) नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बस सेवा बंद असल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!