‘त्या’ महिलेला पोलिसांनी केली अटक; पहा कोण आहे ती महिला? काय आहे प्रकार…

मुंबई दि.21 एप्रिल – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना बलात्काराची (Rape) तक्रार करण्याची धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना धमकावणाऱ्या ती महिला रेणू शर्मा असून तिला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) इंदौर येथून अटक केली आहे.

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.  गुन्हा दाखल त्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस ठाण्यात इंदौरच्या महिले विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबधित गुन्हा पुढील तपासासाठी क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

कोण आहे रेणू शर्मा?
आरोपी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात यापूर्वी ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची (Rape) तक्रार केली होती. काही दिवसानंतर या महिलेने मुंडेविरोधातील सदर तक्रार मागे घेतली होती. रेणू शर्मा हि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांची लहान बहिण आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) हिच्या मुंडे यांच्यावरील आरोपानंतर खळबळ उडाली होती.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्मा या महिलेने आंतरराष्ट्रीय नंबरहून फोन करत 5 कोटी रुपये किंमतीचे दुकान आणि महागड्या मोबाइलसाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे तगादा लावला होता. मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर (Social Media) बदनामी करण्याची व पून्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिलेने दिल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी मलबार हिल पोलिसांत (Police) केली. या प्रकरणी क्राईम ब्रांचचे (Crime branch) पोलिस अधिक तपास करत आहेत.

( The woman was arrested by the police; See who is that woman? What type is … )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!