विचित्र अपघातात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू; चार वाहने धडकली.

बीड दि.21 अॉक्टोंबर – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) कोळवाडी नजीक नारळाचा ट्रक पलटी झाल्याची दुर्घटना घडली. याच दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने तिथे उभे असलेल्या दोन रिक्षांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या पाठोपाठ अन्य तीन ते चार वाहने अपघातग्रस्त वाहनांवर धडकले.
(13-year-old girl dies in bizarre accident; Four vehicles collided.)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज (दि.21) पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास नारळ घेऊन जाणारा टेम्पो (क्र. एच. आर. 55 बी.ई.8397 ) हा कोळवाडी जवळ उलटला. याची माहिती महामार्ग पोलिसांसह (Highway Police) आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्याठिकाणी महामार्ग पोलिस उपनिरिक्षक (PSI) यशराज घोडके आणि त्यांचे कर्मचारी हे मदत कार्यासाठी तेथे आले होते.
मदतकार्य सुरू असताना तेथे रिक्षा ( क्र.एम.एच.23 ए. आर. 0468 ) तसेच भाजीपाला घेऊन बीडकडे येणारा रिक्षा (क्र. एम. एच. 23. ए.के. 5470) व कार (क्र.एम.पी. 68 सी. 2618) रस्त्याच्या बाजुला उभे होते. या वेळी सिमेंट घेऊन येणारा ट्रक क्र. (एम. एच. 18 ए. ए. 9679 ) रिक्षा व कारला धडकला. या वेळी एका रिक्षात बसलेली वैष्णवी आनंद आडगळे (रा. शाहूनगर बीड, वय 13 ) हिचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. धनंजय बापू वाघमारे ( वय 39, रा. पाली ) हे जखमी झाले आहेत. यावेळी मदत कार्य करणाऱ्या एका पोलिसालाही (Police) वाहनाने जोराची धडक दिल्याने तोही जखमी झाला.
दरम्यान, साडेचार वाजता सोलापूरकडून औरंगाबादकडे (Aurangabad) येणारा ट्रक (क्र. आर. जे. 14 जी. के. 0598 ) हा भरधाव वेगाने येऊन पलटी होऊन बीड सोलापूरकडे (Solapur) जाणारा ट्रक (क्र. एम. एच. 23 ए. यू. 9500 ) या ट्रकवर जावून धडकला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आयआरबीच्या (IRB) क्रेनने दोन्ही ट्रक बाजुला काढून वाहतूक सुरळीत केली.