विहिरीत पोहण्यासाठी उडी घेतलेला तरुण बुडाला; बीड शहरातील घटना.

बीड दि.24 मे – बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील एका जुन्या विहिरीत पोहण्यासाठी उडी घेतलेला 15 वर्षीय युवक पाण्यावर आलाच नसून त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना आज घडली. त्याचा अग्निशामक दलाकडून विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीड शहरातील आर्यन मारोती शिंदे (वय 15) रा.वडारवस्ती, बार्शी नाका हा आपल्या मित्रांसोबत बार्शी नाका परिसरातील एका जुन्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. प्रकाश आंबेडकर नगर भागात असलेल्या या जुन्या विहिरीचा कधीच उपसा झालेला नाही. याच विहिरीवर आर्यन आपल्या चार मित्रांसोबत पोहण्याच्या उद्देशाने गेला होता.

विहिरीवर गेल्यानंतर आर्यनने विहिरीत उडी घेतली. मात्र बराच वेळ होवूनही तो वर आला नाही. यामुळे घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी त्याच्या कुटूंबियांना याची खबर दिली. घटनेची माहिती मिळताच आर्यनच्या कुटूंबियांनी व नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावासाठी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

जवळजवळ सात परस खोल असलेल्या या विहिरीत पाच जणांनी शोधकार्य सुरु केले. मात्र खाली गाळाचे प्रमाण अधिक असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. पाणी उपसा करण्याची यंत्रणा नसल्यामुळे बचाव पथकासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या घटनेनंतर कुटूंबियांचा एकच आक्रोश दिसून आला. युवकाच्या अकाली निधनामुळे शिंदे कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

( The young man who jumped to swim in the well drowned; Incidents in the city of Beed. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!