बहिणीने प्रेम विवाह केल्याने अल्पवयीन भावाने उचलले टोकाचे पाऊल…..

बहिणीने प्रेम विवाह केल्याने अल्पवयीन भावाचा राडा; गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : बहिणीने प्रेम विवाह केला, या रागातून अल्पवयीन भावाने बारा वाहनांची तोडफोड केल्याची घटना रात्री घडली असून याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी Police एकाला अटक करुन चौकशीसाठी एकास ताब्यात घेतलं आहे.
चिंचवडच्या वेताळनगरमधील एका तरुणीचे शेजारच्याच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मंगळवारी (27 ऑक्टोबर) या दोघांनी एका मंदिरात जाऊन प्रेम विवाह केला. यामुळे संतापलेल्या अल्पवयीन भावाने टोळक्यासह रात्री साडे अकराच्या सुमारास जोरजोरात ओरडून राडा केल्याचे उघड झाले. यात रिक्षा, तीनचाकी मिनी टेम्पो आणि दुचाकी अशा बारा वाहनांची तोडफोड करत टोळक्याने हातात तलवार आणि कोयते नाचवत नागरीकांत दहशत निर्माण केली. वाहनांचं नुकसान झालेल्यां वाहनधारकांनी चिंचवड पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारी वरुन चिंचवड पोलिसांनी एकाला अटक करुन चौकशीसाठी एकास ताब्यात घेतलं आहे. नवनियुक्त पोलीस Police आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिस पुढील तपास करीत आहे.