धारुर व परळी परिसरातील पक्षी निरिक्षणात आढळले हे पक्षी

किल्लेधारूर/परळी दि.११(वार्ताहर) पक्षी Bird सप्ताहच्या पार्श्वभूमीवर धारुर Dharur शहरानजीक असलेल्या अंबाचोंडी Ambachondi येथील नदी परिसरात तर परळी Parli येथे नागापुर Nagapur वाण प्रकल्प परिसरात पक्षी निरीक्षण कार्यक्रम पार पडला. देशी-विदेशी अशा विविध पक्ष्यांची Birds ओळख करुन घेण्यासोबत पक्षीप्रेम वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी या परिसरात विविध प्रजातीच्या पक्षांचे निरिक्षण पक्षी मित्रांना झाले.
वन परिक्षेत्र धारुरच्या Dharur वतीने पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने क्षेत्रात पक्ष्यांविषयी जनजागृती व आवड निर्माण करण्याच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साधारणपणे ५० ते ६० पक्ष्यांचे निरिक्षण व ओळख यात करण्यात आली. अंबाचोंडी Ambachondi परिसरात कोतवाल, खंड्या, सातभाई, तांबट, वटवट्या, वेडा राघू, टकाचोर, पाणकावळा अशा प्रकारच्या पक्षी आढळून आली. पक्षी मित्र रत्नाकर निकम यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे याभागात आढळलेली पक्षी हे भारतीय असुन अद्याप विदेशी पाहुंण्याचे आगमन झाले नसल्याने विदेशी पक्षी आढळली नाहीत. साधारणपणे डिसेंबर महिन्यात विदेशी पक्षांचे आगमन होते. परळीतील Parli नागापुर Nagapur वाण प्रकल्प परिसरात राखी, मोरहून, गुलाबी मैना, माऊमुनिया, पठाणी, सूर्यपक्षी, गरुड अशा प्रकारच्या पक्ष्यांची ओळख करण्यात आली. सकाळी ६ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु झाला. धारुर Dharur वन परिक्षेत्र अधिकारी एस.एस.मुंडे, वनपरिमंडळ अधिकारी एस.जी. वरवडे, धारुर येथील युथ क्लबचे अविनाश चिद्रवार, धिरज भावठाणकर, सुरेश शिनगारे, सुर्यकांत जगताप, प्रा.विजय शिनगारे, दत्तात्रय गोरे, प्रकाश काळे, अंबाजोगाई येस ग्रुपचे पक्षी मित्र शंकर कराड रत्नाकर निकम, सरमंद वालेकर, राजेसाहेब किर्दक, वनरक्षक एस.ए. मोराळे, डि.के. परजणे, एस.एस.वनवे, वाय. ये. कांबळी, डि.व्ही गुट्टे, एस.एम. सावंत, एल.जी. वरवडे आदी वनकर्मचारी यांच्या सह पत्रकार व युथ क्लब सदस्य उपस्थित होते. परळी Parli येथील पक्षी Bird निरिक्षण कार्यक्रमात वन परिक्षेत्र अधिकारी बी.एस.गित्ते, पक्षी मित्र हेमंत धानुरकर, सौ. तारका वानखेडे, वनपाल राठोड, वनरक्षक व्ही.एम.दौंड, पी.व्ही.सोळंके, अद्वेत गित्ते व भगवान शेप उपस्थित होते.