असे घडले बनावट नोटांचे कांड… पहा आरोपीत कोणाचा समावेश

किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) लॉकडाऊन (Lockdown) काळात व्यवसायाला फटका बसला व खर्चाला पैसे नसल्याच्या कारणाने बनावट नोटा छापल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. शंभर, दोनशे आणि दोन हजारांच्या बनावट नोटा चलनात आणल्या याबाबत सिडको पोलिसांनी (Cidco Police) तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ८५ हजार २०० रुपयांच्या नोटां व छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले होते. यातील एक आरोपी धारुर येथे ग्राहक सेवा केंद्र चालवत असून खर्चाला पैसे नसल्याने त्याने बनावट नोटा (Counterfeit notes) छापण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे पोलीस (Police) तपासातून समोर आले आहे. आरोपीमध्ये एका एसटी बस चालकाचा समावेश आहे. धारुर (Dharur) येथे छापा पडल्या नंतर शहरात खळबळ उडाली होती.

बनावट नोटा प्रकरणी संदिप श्रीमंत आरगडे ३२, रा.वैतागवाडी, पैठण रोड, औरंगाबाद (Aurangabad), निखिल बाबासाहेब संभेराव, २९ रा. पहाडसिंगपुरा, औरंगाबाद (Aurangabad) आणि आकाश संपत्ती माने राहणार धारूर जि. बीड (Dharur) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. या बनावट नोटा (Counterfeit notes) प्रकरणात एसटी महामंडळात बस चालक असलेल्या संदीप आरगडे याचा आरोपीत समावेश आहे. त्याने या बनावट नोटा काही प्रवाशानांही दिल्या आहेत. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीत धारुरचा (Dharur) आकाश माने याने लॉकडाऊन (Lockdown) काळात व्यवसायाला फटका बसल्याने खर्चाला पैसा नसल्यामुळे तीन महिन्यापुर्वी हा गोरखधंदा सुरु केल्याची कबुली दिली. माने हा २० हजार रुपयात एक लाखाच्या बनावट नोटा देत होता. आरोपी मानेने त्याच्या लॕपटॉपमध्ये २० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंतच्या चलनातील नोटा स्कॕनरवरुन स्कॕन करुन ठेवल्या. जशी अॉर्डर मिळेल त्या प्रमाणे तो नोटांची छपाई करुन देत होता. त्यांच्या जवळ १०० रुपयांच्या ४७ नोटा २०० रुपयांच्या ५१९ नोटा आणि दोन हजारांच्या बनावट नोटा (Counterfeit notes) आढळून आल्या. त्यांच्याकडून २ लाख ८५ हजार २०० रुपयांच्या नोटां व छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले होते. बुधवारी तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस (Police) कोठडी मिळाली. आरोपीने आतापर्यंत कुठे आणि किती जणांना नोटा दिल्या व यात आणखी कुणाचा सहभाग आहे याबाबतचा तपास सिडको पोलिसांनी (Cidco Police) सुरु केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!