माझं गाव

धारुरमध्ये आत्मदहनाचा थरार…! ध्वजारोहनानंतर तहसीलमध्ये घडला प्रकार.

किल्लेधारूर दि.26 जानेवारी – धारूर (Dharur) शहरातील मंडप व्यवसायिक पवन तट यांनी कोविड काळात तहसीलदार यांच्या आदेशाने कोविड सेंटरला कोविंड रुग्णांसाठी बेड, बेडशीट व इतर साहित्य पुरवले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही प्रशासनाने त्यांचे देयकं अदा केले नसल्याने तट यांनी आज ध्वजारोहनानंतर थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला.

(This person from Dharur will set himself on fire …! See what is the reason.)

कोविड सारख्या महामारीत (Coron outbreak) आपल्या जिवाची पर्वा न करता विविध साहित्य प्रशासनाच्या वतीने ज्या-ज्यावेळी मागण्यात आले त्या त्यावेळी वेळेची पर्वा न करता साहित्य प्रशासनाला पुरविण्याचे काम तट यांनी केलेले आहे. मात्र या दिलेल्या साहित्याचे देयक वारंवार तहसीलदार यांना मागणी करून मिळत नसल्याने तट यांनी टोकाची भुमिका घेतली.

हे देयक मिळवण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा मंडप व्यवसायिक पवन तट यांनी निवेदनाद्वारे दिला होता. सन 2019 20 या काळात कोरोनाचा (Corona) मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता. अशा परिस्थीतीत रुग्णांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर (Covid Care center) उभारण्यात आले होते. या कोविड सेंटरला रुग्णांसाठी लागणारे बेड, बेडशीट व इतर साहित्य पुरवण्यासाठी धारूर तहसीलदार यांच्या वतीने आदेश दिले होते.

दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रशासनाला जीवाची पर्वा न करता कामगारांना सोबत घेऊन जे मागतील ते साहित्य वेळोवेळी पुरवण्याचे काम पवन तट यांनी केले. कालांतराने कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने कोव्हिड सेंटर बंद करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या साहित्याचे देयक 3 लाख 42 हजार रुपये तहसीलदार यांना सुपूर्द केले. वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा मारल्या मात्र दोन वर्षे उलटूनही प्रशासना च्या गलथान कारभारामुळे अद्याप मिळाले नाही.

यामुळे पवन तट यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी दिनांक 05 जानेवारी 2022 ते 26 जानेवारी 2022 या काळात हेे देयक नाही मिळाल्यास कुठल्याही प्रशासकीय कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा तट यांनी निवेदनाद्वारे राज्याचेे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) दिला होता.

ध्वजारोहनानंतर केला आत्मदहनाचा प्रयत्न
आज प्रजासत्ताक दिनाचे तहसील कार्यालयात 9 वाजून 15 मिनिटाला तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. यानंतर तहसीलदार व इतर अधिकारी दालनाकडे जात असताना अचानक तट यांनी भारत माते की जय म्हणत अंगावर पेट्रोल ओतून घेतले. यावेळी तात्काळ सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बाष्टे यांनी पवन तट या युवकास ताब्यात घेतले.

ध्वजवंदन करण्यासाठी उपस्थित होते पोलिस
तहसील कार्यालयाचे मुख्य ध्वजवंदन करण्यासाठी यावेळी पोलिस निरिक्षक नितिन पाटील यांच्यासह पोलिस (Police) पथक उपस्थित होते. यामुळे तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी तहसीलदार शिडोळकर यांनी दोन दिवसांत देयक अदा करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढील कारवाईसाठी पोलिसांनी तट यास पोलिस ठाण्यात नेले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!