अंबाजोगाईत तीन कॉलेज कुमार पोलिसांच्या ताब्यात; पहा काय आहे प्रकार…

अंबाजोगाई दि.20 एप्रिल –गेल्या काही दिवसापासून मोटरसायकलच्या (motor cycle) चोरीच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ झाली होती यामुळे पोलिसावर या चोर मोटरसायकल चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते. मात्र डी.बी पथकाने या मोटरसायकल चोर टोळीचा पकडून गजाआड करत त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

दुचाकी चोरट्यांनी अंबाजोगाई (Ambejogai) तालुक्यासह शहरात बँक समोरून, बिल्डिंगच्या पार्किंग मधून, दवाखाना व इतर सार्वजनिक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

अज्ञात चोरटे दररोज कुठे ना कुठे मोटरसायकल चोरून प्रसार होत होते. मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. तसेच यामुळे पोलिसांची (Police) बदनामी भरपूर प्रमाणात होत होती व पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात असे नागरिक टोमणे मारत होते यामुळे या चोरांची टोळी पकडण्यासाठी अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक (Police Inspector) बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय (PSI) सुर्यवंशी, डी.बी. पथकातील नरहरी नागरगोजे, एलमाटे, घोळवे व इतरांनी कसोशीने तपास करून तीन कॉलेज कुमार तरुण मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

यामध्ये होंडा (Honda) कंपनीच्या शाईन मोटरसायकल 2, एक बुलेट, होंडा कंपनीची ड्रीम मोटरसायकल,होंडा स्कुटी जप्त केल्या असून आरोपी संतोष बाबासाहेब मुंडे रा. वरवटी वय 21, प्रीतम लक्ष्मण जाधव वय 23 रा.नागझरी , प्रशांत पंडित मुंडे वय 19 वर्ष अंबाजोगाई या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.

या टोळीकडून खेड्यापाड्यात मोटर सायकल विकल्याची चर्चा आहे हे चोरटे चांगल्या मध्यस्तीच्या मार्फत स्वस्त दरामध्ये मोटर सायकल विकत असत यातील एक मुलगा माजी सरपंचाचा आहे तर दुसरा मुलगा हा माजी सैनिकाचा आहे यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्यांना पोलीस आरोपी करणार का?
चोरलेल्या मोटरसायकल स्वस्तात विकत घेऊन उजळ माथ्याने फिरणाऱ्यांना जेलची हवा दाखवत नाहीत तो पर्यंत चोरीचे सत्र थांबणार नाही. यामुळे संबधित चोरट्यांनी ज्यांना वाहनं विकली आहेत त्यांना सह आरोपी करण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

( Three colleges in Ambajogai police custody; See what’s the type … )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!