विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षाची शिक्षा व दंड ; धारूर कोर्टाचा निकाल.

46 / 100

किल्लेधारूर दि.4 अॉक्टोंबर – विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा धारूर कोर्टाने सुनावली आहे. धारुर तालुक्यातील जहागीर मोहा येथे सहा वर्षां पूर्वी चुलत दिराने भावजईचा विनयभंग केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.
( Three years of punishment and fine to the accused who commits molestation; Dharur Court Verdict. )

धारुर पोलीस ठाण्यात (Police Station) देण्यात आलेल्या फिर्यादीनूसार फिर्यादी पिडितेचे पती दि. 18 मे 2016 पासून प्रशिक्षण कामी अंबाजोगाई (Ambajogai) येथे होते. त्या वेळेस पिडितेचा चुलत दिर रंजीत धर्मराज चिरके, रा. जहांगीर मोहा हा अधुन मधुन मोबाईल चार्जिंगसाठी (Mobile charging) घरी येत जात होता. दि. 22 मे 2016 रोजी फिर्यादीच्या घरात मुला सोबत असतांना व ती स्वयंपाक करत असतांना चुलत दिर मोबाईल चार्जींग लावण्यासाठी रात्री आठ वाजता घरात आला व चांर्जीग का होत नाही असे म्हणाला, त्यावर फिर्यादी चार्जीग पाहण्यासाठी गेली असता आरोपीने फिर्यादीचा (molestation) उजवा हात धरला. त्यावेळेस हात सोडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीचे नाकावर लाकडाने मारून जखम केली व रक्त निघत असल्याचे पाहून आरोपी पळून गेला. ही बाब फिर्यादीने तिचे पतीस फोन वरून सांगितली व डॉक्टरकडे गेली. त्या नंतर फिर्यादीने दि.23 मे 2016 रोजी पोलीस स्टेशन घारूर (Dharur) येथे जावून रितसर फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार ठाणे अंमलदार धारूर यांनी गुन्हा रजि. नं. 46/2016 कलम 354, 462, 324 भा. द. वि. नुसार नोंद होवून पुढील तपास श्री. एस. यू. सुतनासे यांचेकडे दिला. त्यानंतर सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. त्या नंतर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील आर. बी. चोटपगार यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने युक्तीवाद करून फिर्यादी पक्षाची बाजु मांडली. त्या नुसार दि.3 रोजी धारूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस दोषी ठरवले. त्या वेळेस देखील सरकारी पक्षा तर्फे आर. बी. चोटपगार यांनी आरोपीस वरील तिन्ही कलमान्वये असलेल्या तरतुदी नुसार जास्तीत जास्त शिक्षा आरोपीस देण्याबाबत विनंती केली. अभियोग पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. कदम यांनी आरोपीस सदर प्रकरणात कलम 452 भा. द. वि. प्रमाणे तीन वर्षांची शिक्षा व दोन हजार रूपये दंड, कलम 354 भा. द. वि. प्रमाणे दोन वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड, कलम 324 भा. द. वि. नुसार 6 महिन्याची शिक्षा व एक हजार रुपये दंड व फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून आरोपीने पाच रूपये देण्याबाबत आदेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!