आज बीड तालुक्यात साडेतीनशे तर जिल्ह्यात एक हजार पाच नवीन रुग्ण.

  1. बीड दि.16 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 3655 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1005 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2650 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today in Beed taluka three hundred and fifty and in the district one thousand five new patients.)

आज चाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात तब्बल 348 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आ अंबाजोगाईत 142 व आष्टी तालुक्यात 168 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 29 केजमध्ये 98 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-348, अंबाजोगाई-142, आष्टी-168, धारुर-29, गेवराई-67, केज-98, माजलगाव-60, परळी-29, पाटोदा-21, शिरुर-21, वडवणी-22 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत असल्याने आता कोविड काळजी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही स्वरुपाच्या माहितीसाठी आता 24 तास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठल्याही कोविड सेंटरमधील उपलब्ध खाटा व रुग्णालयाबाबतची माहिती तसेच प्रशासनाला काही सुचना अवगत करावयाच्या असल्यास 02442- 222604 या क्रमांकावर तर औषध उपलब्धते बाबतच्या अनुशंगाने किंवा रेमडीसीवीर इंजेक्शन च्या उपलब्धतेच्या अनुशंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या 8446165371 या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

जिल्ह्यात आता कोविड सेंटर फुल होत असुन इतर समस्या पुढे येत आहेत. बुधवारी रात्री 8 पासून राज्यात कलम 144 लागू करत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील पंधरा दिवस यामुळे सर्वांना घरातच रहावं लागणार आहे. आज दुसऱ्या दिवशीही दुकाने कडकडीत बंद असताना सडक सख्याहरी रस्त्यावर भटकत असल्याचे दिसून येत आहे. तर पोलिस प्रशासनाला आता कठोर भुमिका घेण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद ठेवत चांगला प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मागील चोवीस तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान काल 2 लाख 34 हजार 452 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दुसरीकडे 53 हजार 335 रुग्ण कोरोना मुक्त झाली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 29 लाख 59 हजार 056 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सध्या 6 लाख 20 हजार 060 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यात कोरोना रिकव्हरी रेटमध्येही घसरण झाली असून राज्यात सध्या 81.3 एवढा रिकव्हरी रेट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!