जिल्हा आटोक्यात … बीड जिल्ह्यात आजचे कोरोना बाधित; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.23 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 4164 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 55 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4109 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-20, अंबाजोगाई-7, आष्टी-10, धारुर-4, गेवराई-1, केज-2, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-3, शिरुर-2, वडवणी-5 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यात तीन वेळा आकडा शंभराच्या आत आला होता. आज तर केवळ 55 रुग्ण आढळून आले आहेत. काल व आज दि. 23 रविवारी बहुतांश तालुक्यात बाधितांची संख्या 10 च्या आत तर दोन तालुक्याची संख्या दहा पेक्षा जास्त होती.

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी 4 हजार 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 4 हजार 780 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 64 लाख 24 हजार 651 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 31 हजार 999 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 530 हजार 182 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात रविवारी 145 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 962 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 5 कोटी 22 लाख 92 हजार 131 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 12 हजार 151 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 526 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!