बीड जिल्ह्यात आजचे कोरोना बाधित; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.25 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 4312 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 78 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4234 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची वाटचाल सध्या कोरोनामुक्त होण्याकडे सुरु असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-12, अंबाजोगाई-0, आष्टी-33, धारुर-6, गेवराई-1, केज-4, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-6, शिरुर-6, वडवणी-8 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. सोमवारी केवळ 55 तर मंगळवारी 92 तर आज 78 बाधित आढळून आली. चिंतेची बाब म्हणजे मंगळवारी 24 तासात 5 कोरोना बळी गेल्याची नोंद करण्यात आली.
दरम्यान, मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना बाधितांची (Corona Positive) 4355 नवीन प्रकरणे समोर आली तर 119 रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणांसह, संक्रमित लोकांची संख्या 64,32,649 पर्यंत पोहोचली आहे, तर साथीमुळे 119 अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढून 1,36,355 झाला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 6,795 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 62,43,034 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात 49,752 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांचा रिकव्हरी दर 97.05 टक्के आहे, तर मृत्यूदर 2.11 टक्के आहे. ते म्हणाले की, गेल्या 24 तासांमध्ये 18,7121 अधिक चाचण्या घेऊन, राज्यात आतापर्यंत 5,26,32,810 चाचण्या कोविड -19 (Covid-19) साठी करण्यात आल्या आहेत.