आज दोनशेच्या जवळ… बीड जिल्ह्यातील बुधवारचे कोरोना अपडेट…

बीड दि.14 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत आहे. आज 5237 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 196 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5041 जण निगेटिव्ह आली आहेत. मंगळवारीही संख्येत मोठी वाढ दिसून आली होती.
(Today’s corona update from Beed district …)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-45, अंबाजोगाई-8, आष्टी-46, धारुर-8, गेवराई-27, केज-10, माजलगाव-8, परळी-2, पाटोदा-21, शिरुर-12, वडवणी-9 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सतत चढ उतार दिसुन येत आहे. शंभरीच्या आसपास स्थिरावलेली संख्या गेल्या काही दिवसांपासून दिडशेच्या पुढे गेली आहे. रविवारी 157, सोमवारी 174 तर मंगळवारी 175 रुग्ण संख्या आढळून आली आहे.
दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 7 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात मंगळवारी 7,243 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10, 978 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 59 लाख 38 हजार 645 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.21 टक्के आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात 196 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.