पुन्हा वाढ… बीड जिल्ह्यातील शुक्रवारचे कोरोना अपडेट…

बीड दि.9 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. आज 3883 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 152 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3731 जण निगेटिव्ह आली आहेत. बुधवारी अचानक वाढलेली संख्या आज पुन्हा उतरलेली दिसत आहे. आजही संख्या दिडशेपेक्षा जास्त आहे.

(Today’s corona update from Beed district …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-27, अंबाजोगाई-2, आष्टी-41, धारुर-6, गेवराई-10, केज-14, माजलगाव-7, परळी-2, पाटोदा-21, शिरुर-15, वडवणी-7 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मंदावला वेग अधूनमधून वाढत आहे. दररोजच्या अहवालात नवीन बाधितांची संख्या शंभरीच्या आसपास स्थिरावलेली असताना अचानक वाढ दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात तपासणीत वाढ झाल्याने बाधितांचा आकडाही फुगला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 43 हजार 393 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 911 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 393 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 911 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 44 हजार 459 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!