शिवशाही बसच्या धडकेने केज मध्ये महिला ठार…

केज दि.२(प्रतिनिधी)- शहरातील केज (Kaij) अंबाजोगाई रोडवर असलेल्या उपजिल्हा रुग्णालया समोर शिवशाही बसच्या धडकेत (Accident) एका महिलेचा जागीच मृत्यू (Killed) झाल्याची घटना आज थोड्या वेळापूर्वी घडली आहे. घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.
सदरील महिला एकटीच असल्याने व महिला अपघातात जागीच ठार (Killed) झाल्याने महिलेचे नाव व गावाचा तसेच वाहनाचा सुरुवातीला शोध लागत नव्हता. मात्र पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहन व मयताबाबत शोध लागला. मयत महिलेचे नाव काशीबाई रामभाऊ थोरात असून ती बनकरंजा येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली. दरम्यान केज (Kaij) उपजिल्हा रुग्णालया समोर हॉटेल्स, मेडिकल्स असल्याने दवाखान्यात येणाऱ्यांना रस्ता ओलांडून जावे लागत आहे. तर सदरील ठिकाणी राज्यरस्त्याचे काम झाले असल्याने व उताराचा रस्ता असल्याने वाहने अतिशय सुसाट वेगात धावत असून अपघाताचे (Accident) होण्याच्या घटना वाढल्या आहेत.. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालया समोर दोन्ही बाजूला किमान तीन गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.