सोमवारीही मोठी वाढ… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.12 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत आहे. आज 3484 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 174 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3310 जण निगेटिव्ह आली आहेत. आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

(Today’s corona update from Beed district …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-31, अंबाजोगाई-1, आष्टी-70, धारुर-10, गेवराई-15, केज-12, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-25, शिरुर-4, वडवणी-5 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संख्या अद्यापही शंभरच्या खाली आलेली नाही. उलट खालावलेली संख्या अधूनमधून वाढत असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या काही दिवसात बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. तर असे असतानाही निर्बंध केवळ कागदोपत्रीच असून लोक कसलेही निर्बंध पाळत नाहीत.

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी  तब्बल 08 हजार 534 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 06 हजार 013 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 156 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 61 लाख 57 हजार 799 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 59 लाख 12 हजार 479 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 16 हजार 165 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!