रविवारी दिलासा… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.27 जून – बीड (Beed) जिल्ह्यात आज 5200 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 131 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5069 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s Corona Update in Beed District)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-30, अंबाजोगाई-9, आष्टी-33, धारुर-7, गेवराई-17, केज-3, माजलगाव-3, परळी-4, पाटोदा-13, शिरुर-5, वडवणी-7 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात तिसऱ्या स्तरावरचेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. बीड जिल्हा तिसऱ्या स्तरातच असल्यामुळे निर्बंध कायम राहणार आहेत. शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यात पेरणीची लगबग असल्याने सर्व बाजारपेठा सर्रास उघड्या असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात कोरोनाचे 9812 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 10 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रशासनाची चिंता कायम आहे. दरम्यान, दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,20,881 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत.

गेल्या 24 तासात राज्यात 9,812 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर आता पु्न्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!