आजचा आकडा 173 … बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.30 जून – बीड (Beed) जिल्ह्यात आज 3979 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 173 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3806 जण निगेटिव्ह आली आहेत. काल मंगळवारी चाचण्या कमी तर पॉझिटीव्हची संख्या वाढल्याचे दिसून आले.

(Today’s corona update in Beed district …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-22, अंबाजोगाई-8, आष्टी-52, धारुर-7, गेवराई-17, केज-15, माजलगाव-9, परळी-3, पाटोदा-15, शिरुर-15, वडवणी-10 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात तब्बल 12 हजार 503 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून यात 416 कोरोना बाधित आढळून आली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात आज 8,623 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 58,09,548 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96% एवढे झाले आहे.

आज राज्यात 8,085 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज 231 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,13,98,501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,51,633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!