बीड पोलिसांचे “प्रोजेक्ट सहायता” उपक्रम

बीडः बीड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात  दि.२ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या गुन्हे बैठकांमध्ये बीड पोलिसांचा ‘प्रोजेक्ट सहायता’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलिसांनी नैराश्याग्रस्त लोकांना कसे ओळखावे कसे हाताळावे याबाबतचे प्रशिक्षण सर्व ठाणे प्रमुख आणि इतर अधिकाऱ्याना  देण्यात आले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा सामना करत असताना समाजात लॉकडाऊन काळात लोकांत मानसिक आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसुन आले आहे. यामुळे गुन्हेगारीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने कौतूकास्पद मोहिम राबवण्यास सुरुवात केली. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २ व ३ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रमुखांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ.मोहम्मद मुजाहिद उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या काळात मानसिक आजारी रुग्ण वाढत असून त्यांना कसे ओळखावे, त्यांचे लक्षणे काय असतात, त्यांना कसे हाताळावे, काय उपचार पद्धती आहे, या बाबत माहिती देऊन प्रशिक्षण दिले. यावेळी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी  पोलिस ठाणे प्रमुखांना इतर अनेक सुचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!