दिलासादायक … बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.11 अॉगस्ट – आज बुधवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 6329 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 109 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 6220 जण निगेटिव्ह आली आहेत. आज मोठ्या प्रमाणात तपासणी अहवाल आले असून यापैकी केवळ 109 बाधित आढळल्याने दिलासादायक चित्र आहे.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-17, अंबाजोगाई-1, आष्टी-27, धारुर-7, गेवराई-5, केज-8, माजलगाव-5, परळी-5, पाटोदा-24, शिरुर-2, वडवणी-8 अशी आहे.

बीड जिल्ह्यात चार तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध आजपासून शिथिल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी मंगळवारी रात्री नवीन आदेश काढत जिल्ह्यातील इतर तालुक्यात असलेल्या स्तर तीनच्या नियमावली प्रमाणे शिथिलता दिली आहे. यामुळे आता आष्टी, पाटोदा, गेवराई व शिरुर कासार या तालुक्यातील आस्थापना आता चार वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

दरम्यान, राज्यात मंगळवारी दिवसभारत 7 हजार 720 रूग्ण करोनातून बरे झाले असून, 5 हजार 609 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय 137 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण 61,59,676 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.8 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,99,05,096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,63,442 (12.75 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,13,437 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 66,123 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!