आज पुन्हा वाढ … बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.11 अॉगस्ट – आज गुरुवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 6590 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 154 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 6436 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-17, अंबाजोगाई-2, आष्टी-56, धारुर-8, गेवराई-12, केज-11, माजलगाव-7, परळी-0, पाटोदा-16, शिरुर-16, वडवणी-9 अशी आहे.

बीड जिल्ह्यात चार तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध आजपासून शिथिल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी मंगळवारी रात्री नवीन आदेश काढत जिल्ह्यातील इतर तालुक्यात असलेल्या स्तर तीनच्या नियमावली प्रमाणे शिथिलता दिली आहे. दरम्यान, काल राज्य सरकारने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली असून आता हॉटेल व्यवसायही रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.

दरम्यान, राज्यात 5 हजार 560 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 69 हजार 002 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 66 हजार 620 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 6 हजार 944 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्रात सध्या 64 हजार 570 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात 163 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 34 हजार 364 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.80 टक्के एवढा झाला आहे.राज्यात आतापर्यंत 5 कोटी 01 लाख 16 हजार 137 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 13 हजार 437 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 860 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!