बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.8 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3100 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 132 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2968 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना चाचण्या कमी होत असल्याचेही दिसत आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
बीड जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटत असल्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या बीड तालुक्यात केवळ 14 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. अंबाजोगाईत ही समाधानकारक स्थिती आहे. आज अंबाजोगाईत 23 व आष्टी तालुक्यात 28 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 5 तर केजमध्ये 23 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-14, अंबाजोगाई-23, आष्टी-28, धारुर-5, गेवराई-4, केज-23, माजलगाव-10, परळी-1, पाटोदा-9, शिरुर-11, वडवणी-4 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आता घटली आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. काल प्रचंड गर्दी दिसून आल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. आज मात्र गर्दीत काही अंशी घट झाली आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी 10 हजार 219 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 हजार 081 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,64,348 इतकी झाली आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट 95.25 टक्के झाला आहे. सोमवारी 154 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,74,320 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 12,47,033 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,323 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.